देशाला मजबूत सरकारची गरज, मोदींचं ट्वीट व्हायरल

Update: 2021-04-25 07:24 GMT
देशाला मजबूत सरकारची गरज, मोदींचं ट्वीट व्हायरल
  • whatsapp icon

देशात मनमोहन सिंह यांचं सरकार असताना तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

या ट्वीट मध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाला मजबूत सरकारची गरज असल्याचं सांगत आहेत. मोदी महत्त्वाचे नाहीत. मी परत जाईल आणि चहाचं दुकान सुरु करेल. मात्र, देश आता हे सहन करू शकत नाही. असं मोदी यांचं ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. मोदींनी हे ट्वीट 29 एप्रिल 2014 ला केलं होतं.

सध्या देशात कोरोनाच्या परिस्थिती देशाची आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडल्याने देशात दररोज हजारो लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. सध्या ट्वीटरवर #ModiMadeDisaster, #भारतकाक्रूरपुत्रमोदी असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे.

दरम्यान मोदींचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मोदी आता राजीनामा द्या अशी मागणी लोक करत आहेत.

Tags:    

Similar News