पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ ; 6 हजार 500 वरून थेट 15 हजार पगार मिळणार

Update: 2024-03-14 03:42 GMT

Mumbai | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालीस पाटलांकरिता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पोलीस पाटलांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. पोलीस पाटलांना आतापर्यंत 6 हजार 500 रुपये पगार प्रतिमहा मिळत होता. यासंदर्भात शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेत, हाच पगार आता महिन्याला 15 हजार रुपयांवर करण्यात आला आहे.


पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारी दि. १३ मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दरम्यान यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळणार. याआधी पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रुपये पर्यंत पगार मिळत होता. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Tags:    

Similar News