अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये साथरोगांत वाढ.

Update: 2023-08-01 03:59 GMT

नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे व काही भागात झालेल्या धगफुटीसदृश्य पावसामुळे आता जिल्ह्यात साथ रोगात कमालीची वाढ सुरू झाली आहे. सर्वाधिक नागरिकांना डोळे येणे, सर्दी,ताप यामुळे शासकीय दवाखाण्यासह खाजगी दवाखान्यात रुग्णांची वाढ झालीय.

श्री गुरू गोविंद सिंगजी जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत तिप्पट वाढ होऊन दररोज साधारणपणे तीन हजार रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

वातावरणात झालेल्या बदलामुळे दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा तर रात्रीच्या वेळी थंडी यामुळे सर्दी आणि तापाने रुग्ण फणफणत असल्याचे प्रमाण वाढत आहे.

सोबतच डोळे येणे, सर्दी, आणि ताप या लक्षणांमुळे नांदेडचे रुग्ण हैराण करुन सोडले आहे.

Tags:    

Similar News