केंद्रीय तपास यंत्रणांचा मोर्चा आता राजस्थानकडे, अशोक गहलोत सरकारचे मंत्री रडावर

Update: 2022-09-07 07:54 GMT

राजस्थान च्या गेहलोत सरकारमधील गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव (Rajendra Yadav)यांच्या घरावर आयकर विभागाने बुधवारी छापा टाकला. कथित राजस्थान मध्यान्ह भोजन घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय आयकर विभाग (Income Tax Department)देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. राजेंद्र यादव यांच्या कोटपुतली येथील कारखान्याशिवाय उत्तराखंडमधील त्यांच्या इतर ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. यादव हे कोतपुतली मतदारसंघाचे आमदार आहेत.

मंगळवारी, केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या संदर्भात, ईडीने दिल्ली-एनसीआर आणि अनेक शहरांमध्ये 35 ठिकाणी छापे टाकले होते. अबकारी धोरणातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात आरोपी असलेल्या समीर महेंद्रूच्या दिल्लीतील निवासस्थानाव्यतिरिक्त, ईडीने गुडगाव, लखनौ, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू या ठिकाणी छापे टाकले होते.

गेल्या महिन्यात सीबीआयने (CBI) बिहारमध्ये आरजेडी नेत्यांवर छापे टाकले होते. आरजेडीचे विधान परिषद आमदार सुनील सिंह,(Sunil Singh) राज्यसभा खासदार अशफाक करीम (Ashfaque Karim) आणि फयाज अहमद (Fayyaz Ahmed) यांच्या घरांवर तपास यंत्रणेने छापे टाकले. हे सर्व नेते आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या जवळचे मानले जातात. जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप या सर्व नेत्यांविरोधात आहेत. रेल्वे भरती दरम्यान हा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्यासंदर्भात हा छापा टाकण्यात आला होता. तिकडे झारखंडची राजधानी रांचीमध्ये खाण घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणा ईडीने (ED) छापा टाकला होता.

सिसोदिया यांच्या घरावर छापा...

सीबीआयने (CBI) दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात गेल्या महिन्यात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच गाझियाबादमधील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत असलेल्या त्यांच्या बँक लॉकरचीही झडती घेतली होती.

विरोधी राजकीय पक्षांचे म्हणणे आहे की, मोदी सरकार सरकारी एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करत आहे. असा आरोप सातत्याने केला जातो. काँग्रेस (congress)अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल (rahul gandhi)गांधी यांची देखील नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

Tags:    

Similar News