नवी दिल्ली : चिनी मोबाईल कंपनी ओप्पोच्या जवळपास 12 कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. वार्षिक अहवालात खर्च अधिक दाखवून करोडो रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई, दिल्लीतील गुडगाव, रेवाडीमध्ये हे छापे टाकण्यात आले आहे. या आधी उत्तरप्रदेशातील ओप्पोच्या काही कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले होते.
माध्यमातून येणाऱ्या वृत्तानुसार आयकर विभागाने ओप्पोच्या अनेक मॅन्युफॅक्च्युरिंग यूनिट, कॉर्पोरेट ऑफिस आणि चिनी कंपन्यांच्या गोदामांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत आयकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये चिनी कंपनी जेडटीएफ कंपनीवरही आयकर विभागाने छापे टाकले होते. भारतात स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. देशात स्मार्टफोनची उलाढाल जवळपास 2.5 लाख कोटीच्या आसपास आहे. यामध्ये 70 टक्के हिस्सा हा चिनी कंपन्याचा आहे.