16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन

Update: 2021-11-15 02:01 GMT

नवी दिल्ली // पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात दौऱ्यावर आहे. ते पूर्वांचल एक्सप्रेस हायवे आणि त्यावरील तयार केलेलं इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन करतील. 16 नोव्हेंबरला पंतप्रधान सुलतानपूरजवळ एक्सप्रेसवेवर C-130J सुपर हरक्यूलिसने लँड करतील आणि हायवेसोबत एयर स्ट्रिपचं उद्घाटन करणार आहेत .

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध राज्यांमध्ये आणखी 19 आपत्कालीन लँडिंग स्ट्रिप तयार केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राजस्थानमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3, तामिळनाडूमध्ये 1, आंध्र प्रदेशमध्ये 2, गुजरातमध्ये 2, हरियाणामध्ये 1, पंजाबमध्ये 1, जम्मू-काश्मीरमध्ये 1 आणि आसाममध्ये 5 आपत्कालीन लँडिंगचा समावेश आहे.

या कार्यक्रमावेळी भारतीय हवाई दलाकडून फ्लांइग स्किल सादर करण्यात येईल. पंतप्रधान मोदींच्या लँडिंगनंतर मिराज 2000 विमान त्या हायवेर लँड करेल. C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिल करतील. तसेच सुखोई, जग्वार आणि मिराज ही विमाने हवेत त्यांचे कौशल्य दाखवतील. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची तीन विमाने तिरंगी सादरीकरण करतील, कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान त्या एक्सप्रेसवेवरून C-130 ने रवाना होतील.

Tags:    

Similar News