नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात १५ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू- पडळकर
नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपल्या कामचुकारपणावर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करतायेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. अशा संकटाच्यावेळी त्या कुटुंबियांना मदत करण्याऐवजी ते आपली राजकीय पोळी भाजतायेत, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.