दहावी परीक्षेत यंदाही कोकण विभागाजी बाजी: सर्वाधिक मुलींचा समावेश
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे.;
यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के इतका लागला असुन सगळ्यात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के इतका आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 92.05 इतके आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 3.82 टक्क्यांनी जास्त आहे. या विद्यार्थ्यांना आज ऑनलाईन तर 14 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळांमधून मूळ गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल.