सोलापूर जिल्ह्यात अद्याप नुकसानीचे पंचनामे नाही ; बळीराजा अडचणीत

Update: 2021-12-14 11:22 GMT

सोलापूर : सांगली आणि अहमदनगरप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील फळबागांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सांगली आणि अहमदनगरमधील नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत. मात्र, आठवडा उलटला तरी सोलापूरात अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ठोस मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. आधीच मागील तीन वर्षापासून द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आहेत. त्यातच चालू हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बाग जोपासण्यासाठी एकरी सुमारे 3 लाखाचा खर्च येतो आणि जवळपास तो खर्च झालेला असतानाच, अचानक झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. तसेच द्राक्ष शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर ते औषध विक्रेते या सर्वांवर याचा परिणाम होणार आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने योग्य मदत करावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

Tags:    

Similar News