टिप्पर पलटी झाल्याने १३ मजूर ठार तर ७ जखमी...,
सिंदखेड राजा तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम सुरू असताना टिप्पर उलटून झालेल्या अपघातात १३ मजुर ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.
सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव जवळ असलेल्या फाट्यावर परिवहन महामंडळाच्या बसला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्पर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात आतापर्यंत १३ मजूर ठार झालेत तर ७ मजूर जखमी झाले आहेत.जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामावरील हे टिप्पर लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की टिप्पर पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली १६ मजूर दबले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केल्यामुळे जखमींना बाहेर काढण्यात य़श आलं आहे.