महाराष्ट्रात पुन्हा महापुरूषांचा वाद पेटला

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परंतु हीच जंयती आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.;

Update: 2023-05-29 12:24 GMT

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याने नव्या वादाला सुरुवात झाली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार झाल्याचे फोटो शेअर करत विरोधकांनी 'शिंदे-फडणवीस' सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "भाजप सरकारचं हे संतापजनक कृत्य पुरोगामी महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही.

माफीवीर सावरकरांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र सदनाबाहेरच्या सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवून भाजपनं महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केलाय. या अपमानाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.

Tags:    

Similar News