नाट्यमय घमोडींनंतर आकार पटेलांना परदेशात जाण्यास मनाई

Update: 2022-04-08 11:28 GMT

गुजरात फाईल्सच्या लेखिका राणा अय्युब (rana ayyub) आणि अमनेस्टी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष आकार पटेल (Akar patel) यांच्या परदेगमनावरुन सुरु असलेला वादात काल स्पेशल सीबीआय कोर्टानं आकार पटेल यांच्या अमेरीका दौऱ्यावर प्रतिबंध घालत कोर्टाच्या आदेशाशिवाय देश सोडता येणार नाही असं सांगितलं आहे. काल अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने (Additional Chief Metropolitan Magistrate)दिलेल्या निर्णयावरही सीबीआय कोर्टानं स्थगिती दिली आहे.

आपल्याविरुद्धची 'लूकआऊट नोटीस' रद्द करण्याची मागणी पटेल यांनी कोर्टात केली होती. सीबीआयची ही नोटीस योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे बजावण्यात आलेली नसून, मनमानी कृत्य असल्याचेही पटेल यांनी याचिकेत नमूद केले होते. पटेल यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क, मिशिगन, बर्कले विद्यापीठांत विविध व्याख्याने, परिसंवादात सहभागी व्हायचे होते.

काल झालेल्या नाट्यमय घडामडीमधे अमनेस्टी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांना अमेरीकेला जाता बंगलोर विमानतळावर अडवण्यात आले होते. सीबीआयच्या नोटीशीनंतर इमिग्रेशन विभागाने त्यांना रोखले होते. कोर्टाच्या आदेशानं हा आदेश रद्दबादल ठरवत सीबीआय प्रमुखांना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाने सीबीआयला धारेवर धरत या कारवाईतील चुकांची जबाबदारी स्वीकारून सीबीआय संचालकांनी पटेल यांची लेखी माफी मागावी, असे निर्देश देताना न्यायालयाने या माफीनाम्यामुळे जनतेचा सीबीआयवरील विश्वास अबाधित राहील, असे सांगितले होते.

दिल्लीच्या विशेष न्यायालयाने परदेशी योगदान नियमन कायदा (FCRA) प्रकरणात पटेल यांच्याविरुद्ध जारी केलेली लुकआउट नोटीस नोटीस तात्काळ मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'बेंगळुरू विमानतळावर इमिग्रेशनकडून सांगितले की, सीबीआयमधील कोणीही त्यांच्या कॉलला उत्तर देत नाही.

काल रात्री उशिरा आकार पटेल यांनी पुन्हा विमानतळावरुन प्रवासाचा प्रयत्न केला. परंतू त्यांना पुन्हा रोखण्यात आलं. त्याविरोधात आकार पटेल यांनी कोर्टाच्या अवमान झाल्याची याचिका दाखल केली होती. त्याच दरम्यान विशेष सीबीआय कोर्टामधे सीबीआयने खालच्या कोर्टाच्या आदेशाविरोधात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशाशिवाय आकार पटेल यांना परदेशात जाता येणार नाही. खालच्या कार्टानं दिलेल्या आदेशावरही सीबीआय कोर्टानं स्थिगिती दिली आहे. कोर्टाच्या अवमानना प्रकरणी खालच्या कोर्टानं दिलेल्या निर्णयावर दुपारी ४ वा. पुन्हा सुनावणी होणार आहे.

कोण आहेत आकार पटेल? :

आकार पटेल हे अ‍ॅमनेस्टी इंडियाचे माजी प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांच्यावर कथितरित्या भारतीयांना अमेरिकेप्रमाणे निषेध करण्यासाठी आहावन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. भादंविच्या कलम ११७, 153 आणि ५०५-१-बी अन्वये गुन्हा जेसी नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.FCRA अंतर्गतही आकार पटेल हे चौकशांच्या फेऱ्यात सापडले होते. 

Tags:    

Similar News