मुजफ्फरनगरमधील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश
मुजफ्फनगरमधील खुब्बापूर येथील नेहा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेने मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केली होती. त्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.
मुजफ्फरनगरमधील मुस्लिम विद्यार्थ्याला तृप्ती त्यागी नावाच्या शिक्षिकेने इतर पाढे न आल्याने इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आम्ही शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेहा पब्लिक स्कूलची 2022 मध्येच परवानगी संपली होती. ही शाळा विना परवाना सुरु होती. त्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज न्यायमुर्ती अभय एस ओका यांच्या पाठीसमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्ती अभय ओका यांनी पोलीस अधीक्षकांकडे मुजफ्फरनगरमध्ये मुलाला झालेल्या मारहाणीच्या चौकशीचा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. तसेच मुलाला आणि त्याच्या पालकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने काय पाऊलं उचलले, याचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.