अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'तौत्के' हे वादळ निर्माण झालं आहे. समुद्र किनाऱ्यावरील सीमाभागांमध्ये या वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या वादळामुळे भारतीय किनाऱ्यालागतच्या राज्यांना मोठा तडाखा बसलाय.
महाराष्ट्राला देखील या वादळाचा फटका बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या वादळाची नक्की काय परिस्थिती आहे? या वादळाचा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला फटका बसेल? समुद्र किनारी असलेल्या मुंबईवर या वादळाचा नक्की काय परिणाम होईल? या संदर्भात हवामान खात्याचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी माहिती दिली आहे.