आयएमए ची रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?

Update: 2021-05-22 16:57 GMT

योग गुरु म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध पंतजली व्यवसायिक रामदेव बाबा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतजलीच्या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथील एका कार्यक्रमात अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' म्हटलं होतं. रामदेव बाबांच्या या वक्तव्यानंतर आता देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रामदेव बाबा यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काय म्हटलंय रामदेव बाबा यांनी...

भारतातील अॅलोपॅथीची रेमडेसिविर, फैबिफ्लू आणि इतर कोरोनाची औषधं फेल झाली आहेत. अॅलोपॅथी एक 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' आहे. पहिल्यांदा क्लोरोक्वीन (हाइड्रॉक्सीक्लोक्वीन) फेल झाली, त्यानंतर रेमडेसिविर फेल झालं, त्यानंतर यांचे एंटीबायोटिक्स फेल झाले, त्यानंतर यांचे स्टेरॉयड फेल झाले, प्लाज्मा थेरेपी वर यांनी काल बंदी घातली. माक्विन देखील फेल ठरलं आणि आता आजारपणासाठी दिली जाणारी फैविफ्लू देखील फेल झाली. लोक म्हणत आहेत काय तमाशा लावला आहे?' असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे.

ते पुढं म्हणतात...

अॅलोपॅथीचं यांचं कोणतंच औषधं कोरोनावर काम करत नाही. कारण तुम्ही शरीराचं तापमान कमी करू शकतात. मात्र, ज्या व्हायरसमुळे इन्फ्लेमेशनमुळे, ज्या बॅक्टीरीयामुळे, त्या फंगस ला, ज्यामुळे तुम्ही आजारी पडले आहात. त्यांचा उपचार तुमच्याकडे नाही. तर मग तुम्ही कसं ठीक करणार... मोठा दावा करत आहे. यावर मोठा विवाद ही होऊ शकतो. मात्र, लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीची औषधं खाऊन झाला आहे. जितक्या लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये न गेल्याच्या कारणाने झाला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याच्या कारणाने झाली आहे. त्या पेक्षा अधिक मृत्यू अॅलोपॅथीच्या औषधांनी झाले आहेत. स्टेरॉयड्स मुळे झाले आहेत. त्यामुळे आता लोकांच्या मृत्यूचं कारण अॅलोपॅथी आहे.

IMA आक्रमक?

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं असून या पत्रात त्यांनी रामदेव बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करु खटला चालवण्याची मागणी केली आहे. असं 'अशिक्षित' वक्तव्य 'देशातील शिक्षित समाजासाठी घातक आहे. तसंच गरीब लोक यांच्या वक्तव्याचा शिकार होत आहे.

रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण हे स्वतः आजारी पडले की अॅलोपॅथीची औषधं घेतात, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या मान्यता प्राप्त नसलेल्या औषधींचा खप वाढेल म्हणून ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही वक्तव्य करत आहेत. रामदेव बाबा यांचा पतंजली आयुर्वेदिक औषधींच्या व्यवसाय आहे. त्याची कोट्यावधीची उलाढाल आहे.

त्यामुळे एकप्रकारे ते अॅलोपॅथीला बदनाम करून, त्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण करून स्वतःच्या व्यवसायासाठी संधी साधत आहे. असं IMA ने पत्रात म्हटलं आहे.

पाहा बाबा रामदेव यांनी नक्की काय म्हटलं होतं?

Tags:    

Similar News