तुमचा पुढचा फोन म्हणून Redmi Note 12 Pro Plus चा विचार करत असाल , चला तर जाणुन घेऊयात फीचर

Update: 2023-01-05 15:47 GMT

Xiaomi ला भारत सरकारकडून तपासाचा ससेमिरा लागला असताना कंपनीने आज तीन Redmi Note फोन लॉन्च केले आहेत आणि ते सर्व 5G साठी तयार आहेत. भारतात रेडमी Redmi Note 12 Pro Plus सिरीज लॉन्च करण्यात आली आहे .Redmi Note 12 ची किंमत 4GB RAM च्या मूळ आवृत्तीसाठी 17,999 रुपयांपासून सुरुवात होणार असुन 8GB RAM पर्यायासाठी 29,999 रुपये किंमत मोजावी लागणार आहे .Redmi Note 12 Pro ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होणार असुन या किंमतीमुळे ही भारतात लाँच झालेली सर्वात महागडी Redmi Note मालिका असणार आहे.

हा फोन खरेदी करण्यासाठी Redmi बँकेने ग्राहकांना सवलत आणि एक्सचेंज ऑफर आणि बोनस देत आहे.या मालिकेतील सर्व 5G-रेडी असतील . Redmi Note 12 Pro Plus या मालिकेत Redmi S किंवा Redmi T प्रकार नसतील.

Redmi Note 12 Pro Plus सिरीज मधील फीजर

भारतात ट्रिपल कॅमेरा मिळत आहे, जो जागतिक प्रकाराचा भाग नाही.

Xiaomi ने यावर फ्रंट कॅमेरा देखील 13MP वर अपग्रेड केला आहे.

Redmi Note 12 Pro+ 200MP कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगसह येईल.

Redmi Note 12 Pro Plus किंमती काय असतील जाणुन घेऊयात.

5G 8GB+256GB साठी 29,999 रुपये किंमत असणार आहे.

12GB+256GB साठी रुपये 32,999 मध्ये उपलब्ध असेल.

3000 रुपयांची सूट मिळवण्यासाठी त्यांचे ICICI क्रेडिट कार्ड वापरू शकतात.

Tags:    

Similar News