'मंदिर उघडली नाहीत तर बळजबरीने उघडावी लागतील - चंद्रकांत पाटील

Update: 2021-09-01 13:06 GMT

अमरावती : राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर बळजबरीने मंदिर उघडावी लागतील असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. चंद्रकांत पाटील आपल्या तीन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

भाजपच्या वतीने राज्यातील मंदिर उघडण्यासाठी राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात आले. मात्र कोरोना तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता टास्क फोर्सच्या सुचनेनुसार राज्य सरकार नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. सोबतच महाविकास आघाडी सरकार नाविलाज म्हणून मंदिर बंद ठेवत आहे असं राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप मंदिर उघडण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. एकीकडे राज्य सरकार दारूची दुकानं सुरू करत आहेत, हॉटेल, मॉल्स सुरू करण्यास परवानगी देत आहे. पण मंदिर का उघडत नाही असा सवाल भाजपकडून केला जात आहे. काही नियम घालून राज्य सरकारने मंदिर खुली करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सोबतच भाजप महाविकास आघाडी फोडत असल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना महाविकास आघाडीने आपली माणसं सांभाळावी आम्ही त्यांना बोलवत नाही तेच आमच्याकडे येत आहेत. अस सल्ला देखील त्यांनी दिला.

Tags:    

Similar News