आमच्या बापाविषयी वक्तव्य केल तर पुन्हा हेच घडणार सुधाकर गायकवाड यांचा इशारा

Update: 2023-06-28 14:02 GMT

पनवेल महापालिकेत येथे करणी सेनेचा नेता अजय सेंगर यांना मारहाण करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वारंवार अपमानास्पद वक्तव्य करत असल्याने त्यांना मारहाण केली. "आम्ही अजय सेंगर यास मारले, तो नाही सुधारला तर त्याला परत मारू" अस वक्तव्य सुधारकर गायकवाड आणि सागर पगारे यांनी केले आहे . अजय सेंगर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान करतो. त्याची बायको आमचा खून करण्याची धमकी देतेय. तक्रार देऊन पोलीस कारवाई दखल घेत नाहीत आणि न्यायालय त्याला जामीन देते. यामुळे आम्ही संतापलो होतो. अजय सेंगर महापालिकेत दिसल्यावर पुन्हा दादागिरी करू लागला मग त्याला आम्ही चोपला असे मतं सागर आणि सुधाकर यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

Full View

Tags:    

Similar News