मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर.. आमदार संजय गायकवाडचं भान सुटलं
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर.. आमदार संजय गायकवाडचं भान सुटलं;
राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप शासन व प्रशासनची झोप उडवत आहे व अश्या संकटाच्या काळात केंद्र सरकार व राज्यातील भाजपाचे नेते गलिच्छ राजकारण करत आहे, असे राजकारण करताना भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. अशी संतप्त भावना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
"भाजपच्या लोकांचे नीच राजकारण आम्ही सर्व महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय, देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील...हे घाणेरडे राजकारण करत आहेत,
कोरोना हा पक्ष पाहून येत नाही, का कोरोना फक्त राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ते यांना होत आहे का? तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे, भाजपाने हे विसरु नये त्यांच्या 105 आमदारांना देखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे. त्यांचे 20 खासदार देखील महाराष्ट्राने निवडून दिले आहे. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील वॅक्सिन कंपन्यांना सांगितलं जात की, तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडिसिवर देऊ नका. पुण्याच्या वॅकसिनवाल्यांना सांगितलं जातंय देऊ नका. केंद्राकडे ऑक्सीजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही. गुजरातला दीड-दीड लाखांचा इंजेक्शन देतात. 50 हजार इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिल्या जातात. इकडे महाराष्ट्रात लोक तड़फड़तात, मरतात, त्यांना देत नाही. अशा प्रकारचे नीच आणि कमीना राजकारण या जगामध्ये या देशा मध्ये कोणी केले नाही.
जे नरेंद्र मोदी सरकार व फडणवीसांचे लोक करत आहे. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळला द्यायला वैक्सीन आहे. इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का? की आपल्या लोकांना देऊ नये. म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे का? अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीसला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता? जर हा फडणवीस मुख्यमंत्री असता तर ह्या भड....ने काय केल असतं..? हा चंपा आणि हे बाकीचे मंत्री असते तर ह्यांनी काय केल असतं..?
आज राज्यातील सर्व मंत्री जीव तोडून नियोजन करताय त्यांना मदत करायची नाही आणि त्यांची मजाक करतात, खिल्ली उडवतात कशा प्रकारे हे सरकार फेल होईल. ह्याची वाट पाहताय, पन तुमच्या सरकार फेल होईल हे पाहण्यामध्ये लाखो लोकांचे जीव जातील, आज ज्याच्या घरातील माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजत की कोरोना काय आहे आणि म्हणून माझं भाजपाच्या लोकांना आवाहन आहे, मला जर कोरोनाचे जंतु सापडले असते तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आणि म्हणून ह्या लोकांनी राजकारण न करता लोकांना मद्त करावी, पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे माणूस जगला पाहिजे. नंतर तुमचे राजकारण आहे, अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, कोन मतदान करेल तुम्हाला? अश्या प्रकारे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेत, चांगलाच रोष व्यक्त केलाय...