'तर पंतप्रधान Narendra Modi यांना अटक करू आणि त्यांना फासावर लटकवणार'- अब्दुल राशिद डार

Update: 2021-10-03 02:43 GMT

जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अब्दुल राशिद डार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबद्दल प्रक्षोभक विधान केल्याने राजकिय वातावरण चांगलंच तापले आहे. जर काँग्रेस सत्तेत आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अटक केली जाईल. त्यानंतर त्यांना फासावर लटकवले जाईल, असं धक्कादायक विधान डार केलं आहे. शुक्रवारी उत्तर काश्मीरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना डार यांनी हा वादग्रस्त दावा केला आहे.

राशिद यावेळी म्हणाले की, कलम ३७० ही आमच्यासाठी एक मोठी शक्ती होती. मात्र भाजपाने हे कलम रद्द केले. जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येईल, तेव्हा सर्वप्रथम नरेंद्र मोदींना अटक करण्यात येईल. त्यानंतर त्यांना फासावर लटकवलं जाईल.

दरम्यान, अब्दुल डार यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानकारक टिप्पणी करणारे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल राशिद डार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा भाजपाने दिला. भाजपाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसला संपूर्ण देशातून नाकारले गेले आहे. काँग्रेसमध्ये केवळ अल्ताफ ठाकूर यांच्यासारखेच लोक असू शकतात. दिवसा स्वप्ने पाहणारेच पंतप्रधान मोदींना फाशी देण्याचा दावा करू शकतात, असा टोला त्यांनी लगावला. 

Tags:    

Similar News