भाजप मध्ये कोण कोण गद्दार आहे हे राष्ट्रवादीत आल्यावर मला समजलं- एकनाथराव खडसे
भाजप मध्ये कोण कोण गद्दार आहे हे राष्ट्रवादीत आल्यावर मला समजलं अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर टिका केली आहे.
गेल्या चार दिवसा पासून विरोधक एकनाथ खडसे यांना ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत परंतु मी कोणताही गुन्हा केलेला नाही सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. गेल्या चाळीस वर्षा पासून तुम्ही सर्व मला ओळखत आहेत चाळीस वर्षात कोणताही भ्रष्टाचार केला नाही. परंतु एका व्यक्तीच्या कट कारस्थानातुन माझ्यावर आरोप झाले असे एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
मी बि एच आर पतसंस्थेचे गैरव्यवहार बाहेर काढले म्हणून माझ्या मागे ईडी लावण्यात आली. बि एच आर च्या ठेवीदारांच्या ठेवी वर यांनी दरोडे घातले.
माझ्या कडे मी इन्कम टॅक्स भरतो. याव्यतिरिक्त जर इतर बेहिशोबी मालमत्ता असेल तर मी ती जाहीरपणे यांना दान देऊन देईल.काहीही करा आणि एकनाथ खडसे यांना जेलात टाका,असे कारस्थान सुरू आहे. परंतु मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला कोणतीही चिंता नाही. गेले चाळीस वर्षे मी दिवसरात्र एक करून भाजपाचा विस्तार केला तरी माझ्यावर पक्ष सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली.माझ्या सारख्या व्यक्ती वर ही वेळ आणण्यात येते तर भाजप मधील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार? मी संकटात असताना शरद पवार साहेब, अजित दादा पवार, जयंतराव पाटील यांनी मला भक्कम साथ दिली. मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराचा शब्द दिला आहे. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने मला तो खरा करून दाखवायचा आहे, असेही खडसेंनी सांगितले.