मी देखील शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो, शेतकरी हीच माझी जात - अजित पवार
राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांच्या बीड मधील सभेनंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
दरम्यान अजिप पवार म्हणाले की " मी देखील शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो, शेतकरी हीच माझी जात असल्याचं त्यांनी सांगितले ते म्हणाले की "कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अनेकांचे फोन आले. विरोधक कायम काहीतरी चुकीची माहिती देतात. मी धनंजयला दिल्लीला जायला सांगितले. धनंजय गेला आणि जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केली. त्यावर अमित भाई शाह यांनी तात्काळ 2 लाख मेट्रिक टन कांदा 24 रुपये प्रतिकिलो रुपयाने खरेदी केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगीतले
बीड | महाराष्ट्रातील सर्वाना सांगायचे आहे की, आम्ही महायुतीत असलो तरी सर्व जाती धर्माचे लोकांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाच्या असतात. 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे अनेकांनी विमा उत्तरवला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 4500 कोटींचा बोजा आला मात्र आम्ही तो सहन करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार.", असा शब्द अजित पवार यांनी बीडमधील जाहीर सभेतून शेतकऱ्यांना दिला.