`माझ्याकडे आहे सत्तेची सीडी, मग कशी येणार ईडी':रामदास आठवलेराज्यात सध्या ईडी (सक्तवसुली संचलनालय) वरुन राजकारण सुरु आहे. नेहमीच काव्यमय शैलीत राजकारण करणारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी 'माझ्याकडे आहे सत्तेची सीडी, मग कशी येणार माझ्याकडे ईडी' असं विधान केलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनाच फक्त 'ईडी'च्या नोटिसा येत असल्याचा आरोप होत असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका विधानाने नवीन चर्चेला तोंड फुटणार आहे.औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना 'माझ्याकडे आहे सत्तेची सीडी, मग कशी येणार माझ्याकडे ईडी' असं विधान आठवले यांनी केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या यांच्या पत्नी यांना ईडीची नोटीस आली असून ईडीच्या नोटीसा फक्त विरोधी पक्षातील नेत्यांना मिळत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की,व्यवसाय करणाऱ्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिक पणे करावा. तिचा तपशील व्यवस्थित ठेवावा. चौकशीच्या वेळी त्यांनी ते सादर करावे. तसेच संजय राऊत म्हणत आहे की त्यांच्याकडे 125 भाजप आमदारांची माहीती आहे, त्यामुळे ती माहिती त्यांनी द्यावी आणि भाजप नेत्यांच्या विरोधात असलेले पुरावे सुद्धा ईडीला द्यावेत,असे आठवले म्हणाले.
तसेच पुढे बोलताना आठवले म्हणाले की, 'मी पीत नाही बिडी, त्यामुळे माझ्याकडे कशाला येईल ईडी.तर 'माझ्याकडे आहे सत्तेची सीडी, मग कशी येणार माझ्याकडे ईडी' असेही ते म्हणाले. त्यामुळे सत्तेची सीडी असणाऱ्या नेत्यांवर ईडीची कारवाईत सूट दिली जाते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.