बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांची कत्तल, पोल्ट्री व्यवसाय डबघाईला

Update: 2021-01-13 13:22 GMT

कोरोनानंतर आता राज्यावर बर्ड फ्लूचं सावट आहे. परभणि जिल्ह्याती मुरम्बा गावात काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परिसरातील शेकडो कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी दीपक मोगलीकर यांच्या निर्देशानुसार या पक्षांना एनेस्थेशिय देऊन मारण्यात आले.

यात एकूण 3 पोल्ट्री फार्ममझील 2600 कोंबड्यांना मारुन पुरण्यात आले आहे. यासाठी 180 जणांची टीम तैनात करण्यात आली होती. यात पशुवैद्यकीय विभागाचे 30 अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग, पोलिस असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कोंबड्यांना मारणाऱ्या 30 कर्मचाऱ्यांना देखील कॉरंटाईन केले जाणार आहे.

Full View


Tags:    

Similar News