मुरुड नांदगावच्या समुद्रकिनारी सापडले मानवी सांगाडे, कधीचे आहेत हे सांगाडे?

Update: 2021-05-10 09:17 GMT

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगावच्या गणपती मंदिराजवळ मानवी सांगाडे आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुरुड नांदगावच्या स्मशानभूमी शेजारी समुद्र आहे. या समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांनी किनाऱ्याची धूप झाली आहे. या परिसरातील वाळू तस्करांनी देखिल वाळू उत्खनन करण्यासाठी किनाऱ्यावर खड्डे खोदल्याने तेथील वाळूच्या टेकड्या ढासळत आहेत. या ढासळलेल्या वाळूच्या टेकड्याखाली अनेक वर्षापूर्वी गाडलेले काही मानवी मृतदेहाचे सांगाडे वर आल्यानं लोकांमध्ये चर्चेला उधान आलं आहे.

दरम्यान मुरुड पोलिस ठाण्याला या घटनेची खबर कळताच पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अलिबाग येथील रायगड जिल्ह्याच्या उप अधिक्षकांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सदर सांगाडे हे सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वी अथवा त्याहून अधिकच्या काळातील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पुर्वी समुद्रकिनारी मृतदेह दफन केले जात असत. त्याकाळी या ठिकाणी वाळूच्या टेकड्याही होत्या. परंतु सध्याच्या काळात येथील नागरिकांनी त्यांचे सपाटीकरण करुन बागायती जमीनी तयाक केल्या आहेत. तसेच या भागातील खाड्यांच्या परिसरातही विकासाच्या नावाखाली अनिर्बंध मातीचे भराव टाकले गेल्यामुळे उधाणाच्या भरतीच्या व पावसाळी उधाणामुळे पाणी किनाऱ्यावर धडका मारायला लागते. परिणामी येथील किनाऱ्याची धूप होऊ लागल्याने अनेक वर्षापूर्वीच्या मृतदेहांचे कुजलेले सांगाडे आता बाहेर येत आहेत. सदर सांगाड्यातील हाडे पुर्णपणे ठिसूळ झाली असून हात लावताच काहींचा भुगा होत आहे.



सदर मानवी सांगाड्यातील हाडे पुन्हा खड्डे खोदून गाडून टाकण्यात आले आहेत. सांगाडे सापडलेली जागा ही नांदगाव ग्रामपंचायतीची असून तिच्या शेजारीच नांदगावची स्मशानभूमी आहे. विशेष म्हणजे या परिसरात काही वर्षापूर्वी धार्मीक स्थळांच्या विकासासाठी शासनाने केलेल्या मदतीतून येथे करण्यात आलेले संडास बाथरुमची शेडही उन्मळून पडली आहे. तसेच आजुबाजुच्या नारळ सुपारीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत.

Tags:    

Similar News