पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'त्या' ट्विटवर कमेंटचा पाऊस

Update: 2021-09-23 02:08 GMT

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी उड्डाण केल्यानंतर एक फोटो ट्विट केला आहे. सोबत "लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते."असं ट्विट केलं आहे.

मात्र, या ट्विटनंतर नेहमी प्रमाणे कमेंटचा पाऊस पडला आहे. Datit congress या ट्विटर हँडलवरून 'नकल में भी अकल चाहिये!' अशी कमेंट लालबहादूर शास्त्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

तर Rishab या ट्विट हँडलवरून "साहेब पेपर, फाईल बघण्याऐवजी देशकडेही बघा" असं म्हणत एका अब्युलन्सचा गर्दीत अडकलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.सोबतच "हवाई उड्डाणाने जमीनीवरील सत्यता बदलत नाही"असं म्हणत निदान गर्दीमध्ये अब्युलन्स अडकणार नाही अशी व्यवस्था करा असं म्हटलं आहे.

तर काही युजर्सने 'हे काहीच करू शकत नाहीत केवळ खासगीकरण करू शकतात' असं म्हटलं आहे. तर अजय दाते नावाच्या एका युजर्सने तर पंतप्रधान मोदींच्या बॅगला लावलेल्या कुलूपाचा फोटो ट्विट करत 'सर आपण आपल्या बॅगला कुलूप का लावले आहे' असा प्रश्न केला आहे. दरम्यान काही मोदी समर्थकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विमानातील फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदींवर ट्विटवरून टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 'विमानात कोण काय करतंय पाहा' ते पाहा असं लिहिलं आहे.

Tags:    

Similar News