courtesy social media
कोरोना संकटामुळे लांबलेला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. पण आता बारावीच्या निकालाची तारीख झाली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे बारावीची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर दहावीप्रमाणे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे.
निकाल कसा पाहता येणार?
बोर्डाच्या पुढील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार
t.
2. hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in
या वेबसाईटवर निकालाशिवाय निकालाबाबतची इतर माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या वेबसीटवर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तसेच मुल्यमापनाची पद्धत निश्चित करण्यात आली होती. दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली होती.