राज ठाकरे यांनी सांगितला फेक न्यूजचा उगम

Update: 2022-05-01 15:09 GMT

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर या सभेत राज ठाकरे यांनी या देशात फेक न्यूजचा उगम कसा झाला याबाबत वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत बोलताना म्हणाले की, देशात संत ज्ञानेश्वरांनंतर या देशात अल्लाउद्दीन खिल्जी आला. त्यावेळी अल्लाउद्दीन खिल्जी याने 1 लाख सैन्य घेऊन येत असल्याची बातमी दिली. त्यानंतर या भुमीतील काही लोकांनी फितुरी केली आणि अल्लाउद्दीन खिल्जी सोबत फक्त काही हजार सैन्य असताना पेरलेल्या अफवेमुळे देवगिरी किल्ला काबीज करणे शक्य झाले.

अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरी जिंकण्यासाठी 1 लाख सैन्य घेऊन येत असल्याची पेरलेली अफवा ही पहिली फेक न्यूज आहे, असे राज ठाकरे यानी म्हटले. तर आता सोशल मीडियाच्या काळात ज्या पध्दतीने फेक न्यूज पसरवल्या जातात. त्या पध्दतीने पहिल्यांदा अल्लाऊद्दीन खिल्जीने देवगिरी जिंकण्यासाठी पहिली फेक न्यूज पसरवली, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News