केंद्रात महाराष्ट्राला किती मंत्री पदे, उद्या होणार शपथविधी

Update: 2024-06-08 08:31 GMT

पुणे - देशात पुन्हा एनडीएचे सरकार होणार असून, उद्या राजधानी दिल्लीत पंतप्रधान पदासह १८ खासदारांचा मंत्रीपदाचा शपथविधी सायंकाळी पार पडणार आहे. या शपथविधी मध्ये महाराष्ट्रातील काही खासदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्या 18 खासदारांचा मंत्रीपदाचा शपथविधी संपन्न होत असताना, या मध्ये महाराष्ट्रातला किती मंत्रीपदे मिळणारं याची चर्चा आहे. उद्याच्या शपथविधी मध्ये नितीन गडकरी, नारायण राणे, रक्षा खडसे, पियुष गोयल या महाराष्ट्रातील नेत्यांची नावे मंत्री पदाच्या शपथविधीसाठी असणार अशी चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील मंत्रीपदावर आपला दावा सांगितला असून, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, श्रीकांत शिंदे, संदिपान भुमरे, यांच्या नावांची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप सोबतच शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाल्याचे चित्र आहे. शिंदेंच्या शिवसेनेने दोन कॅबिनेट मंत्रीपदांसह राज्यमंत्रीपदांवर आपला दावा केला असून, शिवसेनेकडून बारणे, शिंदे आणि भुमरे यांच्या नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे.

दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोबतच देशभरातील अठरा खासदार मंत्री पदाची शपथ घेणार असून यामध्ये महाराष्ट्राला किती मंत्री पदे मिळणार असून,नेमक्या कोणत्या नेत्यांची वर्णी मंत्रीपदावर लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tags:    

Similar News