महाराष्ट्रात नक्की लसीचे किती डोस शिल्लक आहेत?
महाराष्ट्रात नक्की लसीचे किती डोस शिल्लक आहेत? ;
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे डोस मर्यादित आहे. असं सांगितलं जात आहे. तरीही महाराष्ट्रात आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजही देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून ती अंतिम होईपर्यंत त्याहीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोसेस मिळाले आहेत.