सहा महिन्यात निवडणुका लागणार ; राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
सहा महिन्यात निवडणुका लागणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संकेत दिले ते मुंब्रा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते;
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच आपण कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आणि कोणत्याही कार्यकर्त्याची भेट घेणार नाही असं म्हटलं आहे. दरम्यानच्या काळात आपण देवासमोर राज्यात पुन्हा असं संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी म्हंटले. मुंब्र्यातील पक्षाच्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा - मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगळ्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी बोलतांना म्हटलं आहे की, पुढील सहा महिन्यांमध्ये मनपाच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा. जोरदार तयारी करा, केवळ 180 दिवस आपल्याकडे शिल्लक असून आपण केलेल्या कामाच्या बदल्यात लोकांकडून मत मागा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी मास्क लावला नसल्याने मंत्री आव्हाड यांनी त्यांना फटकारले.