...आणि राज्यपाल भगतसिंह कोशारींनी धरला ठेका..

राज्यामध्ये सध्या राजकीय अस्थिरता असताना राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी सध्या होळी निमित्ताने त्यांच्या होल्यारो या मुळ गावी उत्तराखंडमध्ये आहेत. पारंपरिक होळी सण साजरा करताना राज्यपाल नृत्य करताना व्हिडीओ समोर आला आहे.

Update: 2021-03-28 13:59 GMT

राज्यामध्ये सध्या राजकीय अस्थिरता असताना राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी सध्या होळी निमित्ताने त्यांच्या होल्यारो या मुळ गावी उत्तराखंडमध्ये आहेत. पारंपरिक होळी सण साजरा करताना राज्यपाल नृत्य करताना व्हिडीओ समोर आला आहे.

विशेष म्हणजे राज्यलांनी याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट केले आहे.

https://twitter.com/BSKoshyari/status/१३७६१२३१०५४६७१९१२९९

राज्यपाल उत्तराखंडला जाण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भगतसिंह कोश्यारी यांनी भेटून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांच्या भेटीला जाणार होते. राज्यपाल २८ मार्च पर्यंत उत्तरखंड दौऱ्यावर असल्यामुळे भेट मिळणार नाही, असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता राज्यपालांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल-मिडीयावरुन विविध प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

Tags:    

Similar News