कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे पण हा निर्णय चुकीचा आहे. कोण काय घालणार आणि काय खाणार हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शीख धर्मियांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्हा पगडी काढायला सांगाल का? तेव्हा तुम्ही काय बोलत नाहीत. मुस्लीम समाजासोबत अन्याय होत आहे. कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लीम समाजामध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे. आपल्या पतीव्यतीरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर चेहरा खुला ठेवून जाणे गुन्हा आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे मी करे मान्य करु? आम्ही हे लहाणपणापासून वाचत आलो आहोत. या निर्णयामुळे मुस्लिमांसाठी दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहे," अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी दिली आहे.