Hijab Row : पुन्हा हिजाब वाद पेटणार? उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा परीक्षांवर बहिष्कार

Update: 2022-03-15 10:05 GMT

मुंबई : कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातून सुरू झालेल्या वादाचे पडसाद देशभरात उमटले होते. तर याप्रकरणी कर्नाटक राज्य सरकारने शाळा महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. या निकालाचे कर्नाटक राज्यात तीव्र पडसाद उमटले असून विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बंदी घातली आहे. (Karnataka High Court Verdicts on Hijab Case)

कर्नाटक राज्यातील उडूपी येथील महाविद्यालयात मुस्लिम मुलींच्या हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देतांना हिजाब बंदी योग्यच असल्याचा निकाल दिला आहे. तर या निकालावर कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल देतांना म्हटले आहे की, हिजाब परीधान करणे ही मुस्लिम परंपरेचा अत्यावरश्यक भाग नाही. तसेच हिजाब मुस्लिम धर्मातील अत्यावश्यक घटकही नाही. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्यातील शाळा महाविद्यालयामध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा महत्वपुर्ण निकाल दिला आहे. त्यावरून कर्नाटक राज्यातील यादगीर येथील सुरापुरा तालुक्यातील केंबवी सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. तर त्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावरून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात परीक्षेची पुर्वतयारी सुरू होती. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल येताच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत परीक्षेवर बहिष्कार टाकला. तर आम्हाला हिजाब घालून परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार असेल तरच आम्ही परीक्षा देऊ अशी भुमिका विद्यार्थ्यांनी घेतली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकल्याने थंड पडलेले हिजाब प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटलेले हिजाब प्रकरण पेटण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाच्या निकालाचा आदर करण्याची विनंती देशभरातील कायदेतज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात तोडगा कसा निघणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Tags:    

Similar News