हिजाब बंदी योग्यः Adv. असिम सरोदे

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब बंदी योग्यच असल्याचे म्हटले आहे. तर या ऐतिहासिक निकालावर कायदेतज्ज्ञ Adv. असीम सरोदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.;

Update: 2022-03-15 06:26 GMT

कर्नाटकमधील हिजाब वादावर आज मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने हिजाब परिधान करणं हा इस्लाम चा अविभाज्य घटक नसल्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात विद्यार्थी शाळेचा गणवेश परिधान करण्यास नकार देऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. या निर्णयावर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हिजाब बंदी योग्य आहे. शाळा कॉलेज मध्ये हिजाब घालण्याची परवानगी नाकारली जाणे योग्य आहे- कर्नाटक उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे.

हिजाब घालणे हा धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण सगळ्यांनी स्विकारले पाहिजे. या निर्णयाने आपण संवैधानिक होण्याकडे एक पायरी चढलो आहे.

आपला संविधानिक होण्याचा प्रवास सुरु राहील व समजदारी वाढवित जाऊन आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे की कोणत्याही देवाच्या मूर्ती, पूजा, आरत्या शाळा, कॉलेजमध्ये होणे हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही.

घटनेतील कलम 25 नुसार असलेला धार्मिक स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. आपला आपला धर्म घरात पाळावा या पायरीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे हे सतत लक्षात ठेवावे लागेल, अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंट वर दिली आहे.

Tags:    

Similar News