जगातील सर्वाधिक कोरोना मृत्यूंची संख्या भारतात

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. भारतीय मुटेशन मुळे जगभरात चिंता पसरली असताना सध्या देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या कमी असून एका आठवड्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. परंतु संसर्गाची नवीन प्रकरणे आणि कोरोना मृत्यूची संख्या अद्यापही भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे;

Update: 2021-05-20 05:23 GMT

Courtesy -Social media

जगभरात ज्या ठिकाणी ४८ लाखांपेक्षा थोडे अधिक नवे रुग्ण समोर आलेत आणि मृत्यूंची संख्याही ८६ हजारांपेक्षा थोडी कमी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १२ टक्के आणि पाच प्रतितास इतकं आहे. सर्वाधिक प्रकरणं ही भारतातून समोर आली आहे. परंतु गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये १३ टक्क्यांची घट झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यानंतर ब्राझिलमधून सर्वाधिक प्रकरणं समोर आली असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली, तर अमेरिकेतील नव्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांची घसरण तर अर्जेंटिनातील नव्या प्रकरणांमध्ये ८ टक्क्यांची आणि कोलंबियातील प्रकरणांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. 

काल भारतामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ची नोंद झाली असून अधिकृत आकडेवारीनुसार 4519 मृत्यू झाले आहेत. वास्तविक आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते ही संख्या पाचपट अधिक असण्याची शक्यता आहे. देशाचा विचार करतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या तीन राज्यातील परिस्थिती सध्या बिकट आहे. काल महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 1291 कोरोनामुळे मृत्यू झाले असून त्यापाठोपाठ कर्नाटक मध्ये 525 करोना मृत्यू झाले आहेत.

देशांमध्ये सर्वाधिक 33 हजार 59 कोरोना रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळले असून त्यापाठोपाठ केरळमध्ये 1337 कर्नाटक मध्ये 30 हजार 309 तर महाराष्ट्रामध्ये 28 हजार 438 आणि आंध्र प्रदेशमध्ये 21 हजार 320 कोरोना रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. मृतांच्या आकडेवारीतही भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. भारतात नव्या २७,९२२ नोंदी झाल्या. प्रति एक लाख लोकांमागे नव्या दोन लोकांचा मृत्यू होत असून हे प्रमाण चार टक्के इतकं असल्याचं समोर आलं आहे.  यानंतर नेपाळ आणि इंडोनेशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. तरी दुसरीकडे इंडोनेशियामध्ये हे प्रमाण पाच टक्क्यांनी घटलं आहे. 

भारतात कोरोनाची एकूण प्रकरणं २.५४ कोटी आहेत आणि एकूण मृत्यूंची संख्या २,८३,२४८ इतकी आहे. 



 


Tags:    

Similar News