हर्बल तंबाखू : तंबाखूला पर्याय ठरलेल्या पदार्थाला पेटंट

Update: 2021-12-12 03:43 GMT

जगातील रोगनिर्मितीच्या प्रथम कारणांमध्ये तंबाखूचा समावेश होतो. तंबाखूमुळे कर्करोग होतो. निकोटीनमुळे मेंदूचे कार्य कमी होते,विचार करण्याची प्रक्रिया कमी होते, स्वरयंत्र, तोंड, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, डोळे मूत्राशय, पोट, गर्भाशय तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. लैंगिक क्षमता कमी होते. तंबाखूमुळे माणसाचा मृत्यू होतो. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम माहित असताना देखील अनेकजण तंबाखूचे व्यसन सोडत नाहीत. तंबाखू सोडल्यानंतर डोके दुखणे, काम करावेसे न वाटणे , वारंवार तल्लफ होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे व्यक्ती पुन्हा तंबाखूचे व्यसन चालू ठेवते.



 

पण यावर पुणे येथील डॉ ललिता बोरा यांनी तंबाखूला पर्याय म्हणून समर्थ विडा हा पदार्थ तयार केला आहे. हा विडा तंबाखूला पर्याय असून तो पूर्णपणे निकोटीन फ्री असल्याचा दावा त्यांनी केला आहे.




 


कोरोनाच्या आधीपासूनच तंबाकूच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. सिगारेट ओढण्याचे आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाला दूर ठेवण्यासाठी समर्थ विडा हा पर्याय ठरणार असल्याचे डॉ ललिता बोरा यांनी मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितले आहे




 


डॉ. ललिता बोरा यांच्या तंबाकूला पर्याय ठरेल अशा समर्थ विडा या अभिनव प्रयोगाला भारतीय स्वामी स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट मिळाले आहे. यापूर्वी अनेकवेळा हर्बल तंबाकूचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. त्यामुळे समर्थ विडा हा भारतातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरणार आहे. साधारणत: ६० ते ७० टक्के लोकांमध्ये सिगारेट, हुक्का, बिडी तसेच तंबाकू खाण्याची सवय आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तंबाकुमुक्त भारत संकल्पनेतून डॉ. ललिता बोरा यांनी प्रयत्न सुरू केले होते.

यासाठी तंबाकछ खाणाऱ्या तीन हजाराहून अधिक लोकांवर प्रयोग करण्यात आल्याचा दावा डॉ. बोरा यांनी केला आहे. तंबाखूमुक्त होण्यासाठी हर्बल तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (तंबाखू, हर्बल सिगारेट, गुटखा, किमाम) विकसित केली आहे. डॉ. बोरा ह्या गेल्या २५ वर्षांपासून अन्न तंत्र ज्ञ म्हणून काम करतात. त्यामुळे अन्नशास्त्राचा बारकाईने विचार करून समर्थ विडा विकसित केला आहे, असे त्यांनी सांगितले. तंबाखू सारखे दिसणारे व त्याच्यासारखीच चव देणारे खाण्याचे पान व आयुर्वेदिक मसाले वापरून समर्थ विडा तयार करण्यात आला. त्यासाठी ३ हजारांहून अधिक लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यातील ८७ टक्के लोकांचे तंबाखूचे व्यसन सुटून आरोग्यही सुधारले आहे असे डॉ. बोरा यांनी सांगितले. या उत्पादनाला प्रयोगशाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय पेटंट देखील या उत्पादनाला मिळाले आहे.

Tags:    

Similar News