अमरावती जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
अमरावती शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात दोन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर आज शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
दोन आठवड्यापासून दमदार पाऊस झाला नव्हता, त्यामुळे पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र अजूनही चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मंगळवारी रात्री 9 नंतर अमरावती शहरात विजेच्या कड्याकासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दमदार पडलेल्या या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांची वाहने हि बंद पडली होती. शहरातील राजकमल चौक,राजापेठ अंडर वे या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबळी होती. तर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर पिकांना संजीवनी मिळाली असून हवेत गारवा पसरला आहे.