पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Update: 2021-10-03 02:38 GMT

मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. सोबतच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत घाटमाथ्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.तर मध्य महराष्ट्र, कोकण ,गोवा ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचाअंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

तर राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी जोरदार, तर कअशी भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात देखील काही भागात पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Tags:    

Similar News