मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या झाडांच्या खाली किंवा जवळ उभे राहू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच १५ जूनपर्यंत किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या पावसाने नालेसफाईचे सर्व दावे फोल ठरवले होते. तसेच मध्य रेल्वेची लोकल वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती.