मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील शाळा बंद

Update: 2023-07-21 07:08 GMT
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील शाळा बंद
  • whatsapp icon

मुंबईत शुकवारी मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट' जारी केला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात सतत मुसळधार पाऊस पडत असताना, भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी पावसाचा इशारा (Rain Alert) जारी केला, पुढील पाच दिवसांतील हवामान परिस्थितीचा तपशील दिला. राजधानी मुंबईला शुक्रवारी ऑरेंज’ अलर्टवर ठेवण्यात आले. शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Tags:    

Similar News