राज्यात जोरदार पाऊस : ह्या जिल्ह्यांना दिला अलर्ट

Update: 2024-08-23 14:14 GMT

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मराठवाडा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी आज पाऊसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने IMD वर्तवली आहे.

पूर्व-मध्य-अरबी समुद्रातील एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर आणि दुसरा गंगेतील पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झाला आहे. यामुळे राज्यात मान्सून तीव्र होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट :

कोकण मधील रायगड जिल्ह्यात 23 आगस्ट ते 26 आगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट दीला आहे तर पालघर, ठाणे 25 आगस्ट रत्नागिरी 25 ते 26 आगस्ट,पुणे 24 ते 26 आगस्ट आणि सातारा 24 ते 25 आगस्ट घाटमाथा वर जोरदार पाऊसाचा शक्यता आहे.

विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आज 24 तारखेला ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दीला आहे.

यलो अलर्ट - मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर 24 ते 25 आगस्ट सिंधुदुर्ग 24 ते 26 आगस्ट

खान्देशांतील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात 25 आगस्ट तर विदर्भातील इतर भाग 24, ते 25 आगस्ट ला पाऊस आहे.

पुणे शहरात 23 ते 26 आगस्ट ला मध्यम पावसाची शक्यता असून काही वेळा तीव्र सरींचा अनुभव येऊ शकतो, तसेच धुक्याच्या स्थितीमुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. 

Tags:    

Similar News