#Maharashtrarain : बुलडाण्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर

Update: 2021-09-07 08:25 GMT

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी रात्रीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने त्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने सागवान जवळील पुलावरून अजूनही पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर मोताळा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची स्थानिक प्रशासनाकडून आता तरी पाहणी करून लवकरच अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

Tags:    

Similar News