...जेव्हा आरोग्यमंत्रीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवून पक्षाचे कार्यक्रम घेतात

Update: 2021-09-11 15:51 GMT

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहेत. त्यातच राज्यातील रुग्ण संख्या सुद्धा चिंता वाढवणारी ठरत आहे. मात्र असे असतानाही राज्याचे आरोग्यमंत्रीचं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावतात दिसत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पैठण येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली,सोशल डिस्टन्स कुठेच पाळले गेले नाही. तर खुद्द आरोग्यमंत्री यांनीच मास्क घातला नसल्याने कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा केली जाणार.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=400170471473798&id=100044425449800

कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.व्यासपीठावर बसलेल्या राजेश टोपे यांच्या बाजूला सुद्धा कार्यकर्त्यांनी गर्दी तर केलीच पण अनेकांनी मास्क सुद्धा घातले नव्हते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना काही वेगळे नियम आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

Similar News