राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला आवाहन केले आहे. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच मंत्रालयात यावे, सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात गर्दी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे हे मोठे आव्हान असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात कुटेही खाटा कमी पडत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही वाद झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत, तसेच अमित शहा यांनीही वाढत्या कोरोना रुग्णांसंदर्भात काही सूचना दिल्या असून राज्य सरकार त्या सूचनांचे पालन करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.