NawabMalik: नवाब मलिक अटक प्रकरणी ED ला नोटीस

नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर कोर्टाने ED ला नोटीस दिली असून याचिकेवर येत्या 7 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. खालच्या कोर्टातील निकालाचा यावर परिणाम होणार नाही असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Update: 2022-03-02 11:11 GMT

नवाब मलिक यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थातच ईडीकडून झालेल्या अटकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात हिबस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने तुर्तास तरी नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. मात्र खालच्या कोर्टाच्या निकालाचा दोन्ही पक्षावर आणि या सुनावणीवर परिणाम होणार नाही असेही स्पष्ट केले.

दरम्यान, याच प्रकरणाची सुनावणी आता येत्या 7 मार्च रोजी होणार आहे. ईडीने आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणने आहे. मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.


Full View


दरम्यान, न्यायालयाने सुनावणी वेळी सांगितले की, नवाब मलिक यांच्याबाबतच्या प्रकरणावर आम्ही 7 मार्च रोजी सुनावणी घेत आहोत. मात्र, खालच्या कोर्टाने दुसरी रिमांड मंजूर केली तरी ती आरोपीच्या अधिकारांना धक्का न लावता वापरण्या यावी, असेही न्यायालयाने इडीला सांगितले.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी हेबियस कॉर्पस याचिका (habeas corpus petition) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दुपारी 2.30 वाजता सुनावणीस आली होती. 7 मार्च नंतर या याचिकेची सुनावणी नियमित उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे होईल असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News