अर्नबची दिवाळी न्यायालयीन कोठडीतच : उच्च न्यायालयात दिलासा नाहीच
मोठ्या अपेक्षेने जामीनासाठी आग्रह करणाऱ्या अर्नब गोस्वामीच्या वकिलांच्या फौजेच्या पदरात आज पुन्हा एकदा अपयश पडले. मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायमुर्तींनी सर्व पक्षांच्या बाजू ऐकुण ताबडतोब निर्णय देता येणार नाही असं सांगितल्यानं अर्नब गोस्वामींचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.;
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले 'रिपब्लिक वृत्तवाहिनी'चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावरील शुक्रवारची सुनावणी अपूर्ण राहिलेली सुनावणी आज पुन्हा शनिवारी उच्च न्यायालयात झाली. न्यायालयाने आज, शनिवारी सुनावणी ठेवली असली तरी तातडीच्या अंतरिम जामिनाव्यतिरिक्त अन्य मुद्दय़ांबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
परंतु शनिवारीही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही तर ती दिवाळीच्या सुट्टीनंतर घ्यावी लागेल.न्यायालयाला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी असल्याने शनिवारी केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले. अर्णब यांच्या वतीने विधिज्ञ हरिश साळवे आणि अॅड्. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला.
याचिकाकर्त्या आज्ञा नाईक यांच्या वतीने सुबोध देसाईंनी युक्तीवाद केला. त्यानंतर अक्षता नाईक यांच्यासाठी शिरीष गुप्तेंनी युक्तीवाद केला. मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्यासाठी देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. अर्नब गोस्वामींचे वकिल हरीश साळवे्ंनी तातड़ीने जामीन देण्याची मागणी केली. परंतू खंडपीठाने तातडीने याबाबत निर्णय घेता येणार असे स्पष्ट केले. सोमवार पासून कोर्टाला सुटी असल्याने आता अर्नब गोस्वामीची दिवाळी न्यायालयीन कोठडीतच साजरी होईल असे स्पष्ट झाले आहे.