पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्री पद कुणाला द्यायचे याची चर्चा सुरू झाली आहे. पण आता या रिक्त झालेल्या पदावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दावा केला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. हरीभाऊ राठोड हे भटके विमुक्त आणि बहुजन समाजाचे नेते आहेत.
राज्यात शिवसेनेची सत्ता यावी यासाठी आपण ओबीसी नेत्यांची मोट बांधून शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचार केला होता. त्यामुळे आमदारकीची टर्म संपल्यावर काँग्रेसकडून दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. पण शिवसेनेकडून आपल्याला वनमंत्री पद मिळाल्यास राज्यात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.