127 वी घटना दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण- हरी नरके

127 वी घटना दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असं म्हणत जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Update: 2021-08-08 11:18 GMT

127 वी घटना दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असं म्हणत जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमार्फत मराठवाडास्तरीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

जेष्ठ विचारवंत हरी नरके आणि उत्तम उबाळे यांनी ओबीसी समाजातील समाज बांधवांशी यावेळी संवाद साधला. केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली नसून चूक दुरुस्ती केली आहे. केंद्राला जसे अधिकार तसे अधिकार राज्याला असले पाहिजे होते. मात्र मोदींनी हट्ट करून राज्याचे अधिकार काढून घेतले असं नरके यांनी म्हटलं आहे.

सोबतच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर 127 वी घटनादुरुस्ती करण्यात येत. मात्र, हे करत असताना 50% मर्यादा उठवणे गरजेचे असल्याचे देखील नरके यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे जर गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावत असतील तर त्यांनी मुंडे साहेबांचा वारसा जपला पाहिजे अशी अपेक्षा समाजाची आहे. असं देखील नरके यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी समाजाची दिशाभूल करू नये, सत्तेत असताना वेगळी आणि विरोधात असताना वेगळी भूमिका मांडणे हे बरोबर नसल्याचं म्हणत नरके यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

Tags:    

Similar News