लोकलच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या महिलेची छेडः रेल्वे पोलीसांनी घेतले आरोपीला ताब्यात
कल्याणः कल्याणच्या रेल्वे स्थानकावरील प्लटफॉर्मवर लोकलच्या प्रतिक्षेत उभी असलेल्या एका महिला प्रवाशीची छेड काढण्याचा प्रकार घडला. सदरची माहिती कल्याण रेल्वे पोलीसांना मिळताक्षणी छेड काढणाऱ्या आरोपी इसमास रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहणारा आहे.;
कल्याणः कल्याणच्या रेल्वे स्थानकावरील प्लटफॉर्मवर लोकलच्या प्रतिक्षेत उभी असलेल्या एका महिला प्रवाशीची छेड काढण्याचा प्रकार घडला. सदरची माहिती कल्याण रेल्वे पोलीसांना मिळताक्षणी छेड काढणाऱ्या आरोपी इसमास रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहणारा आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर नेहमीच लोकांची गर्दी असल्यामूळे या स्थानकावरुन मोठया प्रमाणात प्रवासी ये - जा करत असतात. डोंबिवलीत राहणारी महिला प्रवासी डोंबिवलीवरुन कल्याणला कामानिमीत्त आली होती. ही महिला प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत असताना एका इसमाने तिला धक्का दिला, चुकून धक्का लागला असेल असं समजून तिने स्वतःला सावरुन तीन नंबरच्या फलाटावरुन सात नंबरच्या फलाटावर गेली. त्या फलाटावरही तोच व्यक्ती तिचा पाठलाग करीत आला आणि त्याने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला.
संशयिताला पोलीस कोठडीः
प्रवाशांच्या सहाय्याने फलाटावर असलेल्या पोलीसांनी या आरोपीला पकडले. रोहीत वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहतो. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सूमारास ही घटना घडली असून कल्याण रेल्वे पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रोहीतला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.